लातूर येथील शासकीय रुग्णालयात नोकरी करत असताना बऱ्याच गोर गरिबांना , हलगरा गावातील नागरिकांना श्रीपती अण्णांनी खुप मोलाचे सहकार्य केले आहे.
लातूर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणालाही दवाखाना विषयी कसलीही अडचण असल्यास अण्णा धाऊन यायचे..
शहरात असून सुद्धा गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात आणा सहभागी राहायचे. शिवाजी टोंपे, मुकुंद अण्णा, लिंबाजी गायकवाड, प्रभाकर गायकवाड, गोविंद सूर्यवंशी, लहू गवळे, गोपीनाथ मुगले, बाबुराव गायकवाड अशा व्यक्ती सोबत राहून अण्णांनी सामाजिक बांधिलकी जपली.
माझे वडील लहू गवळे यांचे पोटाचे क्रिटिकल असलेले ऑपरेशन श्रीपती अण्णा यांच्या मदतीमुळे यशस्वी झाले. त्यामुळे वडीलास जीवदान मिळाले.
अशी एकनानेक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष श्रीपती गायकवाड अण्णांनी मदत केली आहे.
अशा धाडसी, दयाळू मदतगार व्यक्तीस त्यांच्या पुण्य स्मरणादिवाशी विनम्र अभिवादन.. 🙏
ॲड. प्रेमसागर गवळी
मो. 7710932406
0 Comments