Hot Posts

6/recent/ticker-posts

अविरत सेवेचे ३३ वर्ष! एस.टी. चालक सलीम साहेब चिकलेनी गावचे नाव रोशन केले!

 सुपर फास्ट बस चालक अशी ओळख असलेले आपल्या गावातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सलीम नबिसाब चिकले. 

सलीम भाई ड्रायव्हिंग ची सुरुवात एका ट्रक चालवण्यापासून केलेली आहे. असाधारण असे व्यक्तिमत्व असलेले सलीम साहेब नी जीवनाच्या प्रत्येक मोड वर आपली छाप सोडली आहे.

एक उत्तम ट्रक ड्रायव्हर अशी ओळख असलेले भाई महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मध्ये शासकीय सेवेत भरती झाले.. आणि सुरू झाला एक नवीन प्रवास...

जेंव्हा दळणवळण चे मुबलक साधन नव्हते अशा वेळी आपणा हलगरकराना एस. टी. प्रवासा शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी तुम्ही आम्ही सर्वजण त्यांच्या एस. टी. चालवण्याच्या स्टाईलचा अनुभव घेतला आहे.

आम्ही मादिम कॉलेज, औराद येथे असताना सलीम साहेब अगदी वेळेच्या आतच गाडी हलगऱ्यात टच करायचे.. 

खंडोबा मंदिरच्या येथे कोपर्यावर सुलेमान चाचा चे दुकान होते.. सलीम साहेब गावात गाडी एकदम भरकन वेगाने घेऊन यायचे आणि गाडी वळवण्यासाठी पुढे घेऊन जायचे.. कधी कधी मस्करी मध्ये आम्ही म्हणायचो की.. कधी एकदा सुलेमान चाच्या चे दुकान उठवणारेत की ड्रायवर साहेब.. ! 

पण बस चालक चिकले चे जबरदस्त नियंत्रण होते गाडीवर त्यांची भुल कशी होणार बरे..

सलीम भाई जवळ जवळ ३३ वर्ष जनसेवा करत असताना  माझ्या माहिती नुसार निलंगा औराद निलंगा ह्या शेटल बस वर त्यांनी जनतेची जास्त सेवा केली आहे.


एका बस सारख्या यंत्रा वर घट्ट आणि मजबूत पकड कशी करायची हे त्यांच्या कडन शिकावे.. वाऱ्या सारखे सुसाट वेगाने हे बस चालवायचे.. गती रोधक बिना वेग कमी करता कधी पार करायचे ते कळायचे पण नाही.. अपना सर्वांच्या जीवनाला एकेकाळी गती देण्याचे काम करणारे असे ...

त्यांच्या ३३ वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये बस मधील सवारी ला एखादी खरोच सुद्धा येऊ दिली नाही की रोडवर गाडी चालवत असताना कसला अपघातही होऊ दिला नाही. 

निलंगा डेपो ने घालुन दिलेल्या नियोजित फेऱ्या पेक्षा जास्त असे टार्गेट सलीम साहेबांनी पूर्ण करून बहुमान मिळवला आहे. 

कहते है ना - अपने हलगरा गावके लोगोने हर क्षेत्र मे अपना नाम कमाया है और अपने गावका नाम रोशन किया है. ऊनमे से एक अपने सलीम सहाब...

ऐसे झाबांज खिलाडी को सलाम.. 

MSRTC चे लोकप्रिय चालक सलीम चीकले एस. टी. सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत. समस्त एस. टी. मंडळ व प्रवासी यांना नेहमी याद ठेवतील.. 


त्यांच्या उर्वरित आयुष्या स माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि नेत्रदीपक कारकिर्दी साठी हार्दिक हार्दिक अभिनंदन...!

हैदर साब चिकले इनकी फेसबुक पोस्ट के आधार पर...

- प्रेमसागर गवळी, हलगरकर..

  B.C.A. L.L.B.  ( सायबर लॉयर..)








Post a Comment

2 Comments

  1. धन्यवाद गवळी साहेब आपली पोस्टने मन भरून आले

    ReplyDelete
    Replies
    1. Zameer Thank you for your message..
      Aplya manasacha sanman karane kartavya ahe..

      hya madhe kahi add, delete karayche asalyas krupaya sangave...

      Delete