दर्श वेळामोशा - आमच्या गावी ढोबळ भाषेत त्याला 'येळवस' म्हणतात..
हा सण शेतकऱ्यांसाठी एक मेजवानी च असते , साल भर राब राब राबून परिवाराचे तसेच इतरांचे पोट भरण्याचे उत्तम कार्य शेतकरी बांधव करित असतो. ऊन पावसाची कसलीच पर्वा न करता तो आपल्या गुरा ढोरासोबत अगदी त्या सारखंच राबत असतो. म्हणुन तर आपणा सर्वाना धान्य , फळ, भाजीपाला वेळेवर मिळत असतो
तर अश्या शेतकऱ्या साठी आजचा दिवस एका मोठ्या उत्सवापेक्षा काही कमी नसतो.
आजच्या दिवशी पण तो आपले कर्तव्य विसरत नसतो.. आपल्या आप्तेष्ट मित्रांना तो आपल्या शेतात जेवण्यासाठी बोलावतो . आणि काय गंमत आजच्या दिवशी शेतात बसुन जेवण केलेली मज्जा काही औरच असते. एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवण केल्या पेक्षा चवदार आणि प्रसन्न हे आजच्या दिवशी वाटते .
येळवशी चा फेमस मेनू म्हणजे भज्जी, वाळवलेली ज्वारीची भाकर, आंबील, खिचडा, गुळापासून बनवलेली स्वादिस्ट अशी खीर सोबत दुध आणि तुप !
ह्या जेवणाची मज्जाच न्यारी आणि तेही शेतात ! अबब हा दिवस कुणी विसरणार नाही एवढी नक्की सांगतो आणि थांबतो !
Darsh velamosha, Yelwas | Marathwada agriculture festival | shetkaryanchi yelwas | darsh velmaowsha
0 Comments