लातूर जिल्यातील हलगरा येथे असलेले हनुमान मंदिर सामाजिक दृष्ट्या खुप महत्वाचे आहे. गावातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम याच मंदिराच्या परिसरात साजरे केले जातात. तसेच कार्यक्रमांना गावातील सर्व समाजाचे लोक एकत्र येतात.
मुर्तीचे मुख व मंदिराचे द्वार पुर्वेला असल्याने सुर्याची किरणे थेट मंदिरावर पडतात. पुर्वी हे मंदिर अत्यंत साध्या स्वरूपाचे होते. परंतु वाढत्या प्रसिद्धीने मंदिराचा जिर्नोद्धार करण्यात येत आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्ये हे आहेत की,
१} हे मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकर्याना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही.
२} या मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने गावचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथेच होतात.
३}या मंदिरात दर शनिवारी मोठ्रया प्रमाणात भक्त नारळ फोडण्यासाठी येतात.
४} या मंदिरातील हनुमान नवसाला पावतो, असे गावकर्यांचे म्हणणे आहे.
५} या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमात गावातील लहानांपासुन मोठ्यांपर्यंत अनेक गावकरी सहभागी होतात.
हे मंदिर हलगरा गावाचा एक सांस्कृतिक वारसा आहे. ह्या मंदिरावर गावातील लोकांची खूप श्रद्धा आहे.
मंदिर उभारण्याच्या कार्यात सर्वानी सढळ हातानी मदत करा असे आव्हान हलगरा ग्रामस्थ यांच्या तर्फे करण्यात आले.
हनुमान मंदिर निर्माणाचे काम प्रगतीपथावर ...
Information source: from the facebook wall of Amit Sagare
0 Comments