Hot Posts

6/recent/ticker-posts

तुका म्हणे तुम्ही चला हेची वाटे ! भरवसेनी भेटे पाङुरंग !!

वारकरी म्हटल की पढंरीचा पाङुरंग हे त्याचे सर्वस्व
संप्रदायात वारीला अतोनात महत्त्व आहे
देवाने स्वताच आपल्या भक्ताना सागितंलय
आषाढी कार्तिकी विसरू नको मज ! सागंतसे गुज पाङुरंग !!
ज्ञानीयाच्या राजानीही म्हणाव
वारकर्याना प्रत्येक वेळी ह्रदयाने नित्य नुतन दर्शन घङते.
ते या भक्तीप्रेमाच्या गंगेत विरघळून गेलेले असतात
परमार्थाचा जिवनाला स्पर्शही न झालेली आजची तरून पिढी तथा सुशिक्षित मंडळी यात प्रामुख्याने सहभागी होतायत.
पाङुरंग भेटीचा आनंद त्यांच्या अंतकरनात भरभरून वाहताना दिसतो.
वर्षेभर संसारी ताणतनावाचा विसर हरिनामात पङुन गेल्यावर हि मंडळी आनंदाने नाचत नाचत पढंरीकङे संत सगंतित चालत असतात
या संतवचनाप्रमाने मार्गक्रमण सुरू असते
निन्दा स्तुतीची चिंता वारकरी करत नाही
भक्तीचा आनंद फक्त त्याला कळतो
त्याची पाऊल पढंरीच्या त्या विटेवर उभ्या असलेल्या पढंरीनाथाचे ध्यान करत करत चालत असतात.ते ध्यान पहान्यासाठी जिव आसुसलेला असतो.स्थुल देहाने वाटचाल होते खरी पन वारकर्याचं अंतरग त्या परमात्माला अनेकात ऐक शोधत पाऊल टाकत
नामाशी ऐकरूप होतात
येणे दश दिशा आत्माराम
अशी अवस्था प्रात होते
ते साधन म्हणजे फक्त वारीच
संत परंपरेने आपल्याला दाखविलेली हिच ती सोपी वाट
श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात.
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

Post a Comment

0 Comments