Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीमती चंद्रभागा गुणवंत गौरव शिष्यवृत्ती सोहळा संपन्न..

शब्दांकनः सतीश हानेगावे
(स्वातंत्र्य दिन विशेष- दि.15 आँगस्ट 2018)
डीआरसी,ई-वार्ता,औराद शहाजानी

हलगरा:ता.15 हलगरा येथील डाँ.शिवाजीराव पाटील विद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, श्रीमती चंद्रभागा पाटील,हलगरा यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यासाठी चंद्रभागा गुणवंत गौरव शिष्यवृत्ती 2018 प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. मंगलबाई व्यंकटराव पाटील (सरपंच हलगरा) प्रमुख व्याख्याते डाँ.पल्लवी पाटील (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) मुळ प्रेरक मा.श्रीमती चंद्रभागाबाई पाटील (हलगरा) प्रमुख अतिथी मा.अजित माने (सभापती,पं.स.निलंगा) रमेश मदरसे (प्राचार्य, डाँ.शि.पा.वि.हलगरा) आनंत गायकवाड (माजी,कृषी अधिकारी हलगरा) कुमार पाटील(अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समिती,औराद शहा) डॉ. मनोज कदम (कदम क्लिनिक, लातूर) व्यंकटराव पाटील(हलगरा) दिलीप दापके (औराद शहाजनी ) देवदत्त पाटील (माजी सभापती, हलगरा) सतीश हानेगावे (विमाग्राम पुरस्कृत,विमा सल्लागार,औराद शहा) या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या कार्यक्रमाचा आरंभ झाला. 

हलगरा नगरीच्या सरपंचानी गावकर्‍यांच्या एकजुटीतून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये, राजेवाडी हे गाव निलंगा तालुक्यातून प्रथम आणले, या गावास मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व आमिर खान यांच्या शुभहस्ते पंधरा लाखाचे बक्षीस प्रदान करण्यात आले, त्याबद्दल सतीश हानेगावे यांनी डीआरसी औराद शहाजानी, आम्ही तगरखेडकर,एलआयसी निलंगा, मराठा सेवा संघ, जिवलग फाउंडेशन निलंगा,अंनिस लातूर,सर्व राजकिय पक्ष या सर्वांच्यावतीने सौ.मंगलबाई पाटील यांचा शाल पुष्पहारांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. देवदत्त पाटील यांनी केले. प्रस्तावनेत त्यांनी अशा प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून, गावात चांगले काम उभा टाकत असल्याबद्दल दत्ता पाटील यांचे अभिनंदन केले. गावातील होतकरु मुलांना याचा भविष्यात निश्चितच लाभ होईल, असा आशावाद व्यक्त केला. 

अशा प्रकारच्या कार्याची ग्राम विकासासाठी नितांत गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य रमेश मदरसे यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गावातून निश्चितच आदर्श विद्यार्थी घडतील अशी भावना व्यक्त केली. अशा कार्यक्रमातून गावातल्या सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना खूप मोलाची प्रेरणा मिळत असल्याबद्दल, त्याने दत्ता पाटील यांचे आभार व्यक्त केले. बौद्धिक समृद्धीसाठी अशा प्रकारच्या शिष्यवृत्तीतून खऱ्या अर्थाने गुणवंत विद्यार्थ्यांची जडणघडण होणार असल्याची प्रांजळ भावना त्यांनी बोलून दाखवली. गावातल्या जास्तीत जास्त आदर्श विद्यार्थ्यांनी अशा शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा व आपली गुणवत्ता सिद्ध करावी असा आशावाद व्यक्त केला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सतीश हानेगावे यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. या स्वातंत्र्यासाठी हजारो- लाखो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती कशी दिली हे सोदाहरण स्पष्ट केले. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडला पाहिजे, हा या शिष्यवृत्तीच्या पाठीमागचा मूळ उद्देश त्यांनी स्पष्ट केला. 

दत्ता पाटील यांचे स्वतःचे आयुष्य अत्यंत हलाखीत गेले. होरपळलेल्या अवस्थेतच त्यांना शिक्षण घ्यावे लागले. असे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून माझ्यासारख्याच धडपडणाऱ्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक, मानसिक, भावनिक आधार मिळावा व माझ्या गावातून गुणवंत विद्यार्थी घडावेत हे स्वप्न घेऊन दत्ता पाटील यांनी चंद्रभागा गुणवंत गौरव शिष्यवृत्ती पाच वर्षासाठी जाहीर केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही शिष्यवृत्ती प्रोत्साहन म्हणून आहे. विद्यार्थ्यांच्या उभारीसाठी त्यातून जर त्यांना प्रेरणा मिळत असेल तर मी स्वतःला धन्यभागी समजतो, अशी भावना दत्ता पाटील यांची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. माझ्या शिक्षणात माझी आजी चंद्रभागाबाई हिचा सिंहाचा वाटा असल्यामुळेच आज मी या ठिकाणी उभा आहे, अशी भावना आपल्या आजीबद्दल दत्ता पाटील यांनी व्यक्त केल्याचे सांगितले. अजित माने यांनी ही शिष्यवृत्ती निलंगा तालुक्यालाच दिशा देणारी असल्यामुळे असा कार्यक्रम अजून मोठ्या स्वरुपात तो व्हायला पाहीजे असा आभिप्राय दिला. सर्वांना सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

अमेरिकेसारख्या दूर देशात राहून दत्ता पाटील यांनी आपल्या गावातल्या मातीशी जी नाळ जोडून ठेवली आहे, ती निश्चितच स्तुत्य आहे. राजेवाडी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सरपंच व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. डॉ. पल्लवी पाटील यांनी साता समुद्राच्या पलीकडे हलगरचा एक दत्ता पाटील नावाचा व्यक्ती अमेरिकेत काम करतो. तेथे राहून तो गावाशी नाळ जोडून ठेवतो. तो गावांमध्ये अनेक प्रयोग करीत, विविध क्षेत्रात विधायक कार्य करतो. या साऱ्या गोष्टी सुखावणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या आहेत. झारखंड येथील कुपोषित बालकांची अवस्था आणि पोर्णिमा नावाच्या मुलीची कथा, बिहारमधील आनंत कुमार यांनी आयआयटीसाठी पंचवीस रुपयेची घेतलेली फीस, ईराणी मुखर्जी यांचे प्राणीप्रेम अशा अनेक गोष्टीचा संदर्भ देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. मुलींनी स्वरक्षणासाठी कराट्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे सांगितले. 

आमच्या शाहू महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रवेशासाठीचे पत्र घेऊन आला; परंतु आमच्या संस्थेच्या विश्वस्त मंडळाने त्या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला. कारण येथे फक्त गुणवंतालाच वाव मिळतो. हे आमच्या संस्थेने दाखवून दिलेले आहे. हलगरा येथील तीन विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आहेत. ते खऱ्या अर्थाने गुणवंत असल्यामुळे त्यांना आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळाला ही हलगरानगरीसाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दत्ता पाटील यांचे हे कार्य निश्चितच आम्हा-तुम्हा सर्वांना प्रेरणा देणारे आहे. अशा व्यक्तीच्या संपर्कात राहणे हे निश्चितच मोलाचे ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कु. मदरसे साक्षी राजेंद्र, शेख अफसर समद, खंदकुरे प्रज्वल पांडुरंग या तिघांना प्रती 50 हजार रुपये चंद्रभागा गुणवंत गौरव शिष्यवृत्ती व विशेष असे सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सन्मानपत्राचे वाचन सतीश हानेगावे यांनी केले. विशेष प्रोत्साहन म्हणून हलगरा केंद्रात प्रथम येणारी कु. चितकुटे प्राजक्ता राजू हिला पाच हजार रुपयेची शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिरसागरसरांनी केले.

आभार तानाजी जाधव यांनी मानले. दुशन्त सगरे, लक्ष्मण शेळके, व्यंकट चितकुटे, शिवाजी मदरसे, बंकट पाटील, वैजनाथ बिरादार, गोविंद गायकवाड, महादू शेळके, गंगाराम गायकवाड, दत्ता खंदकुरे, छाया जाधव, पुष्पा चव्हाण, अलका पवार, राजश्री मदरसे या साऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती चंद्रभागा पाटील आणि सौ. मंगलबाई पाटील यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post a Comment

0 Comments